घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर; पथकाकडून ७६ सिलिंडर जप्त

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने बुधवारी जिल्ह्यातील ५१ हॉटेल, खानावळची तपासणी केली. यात घरगुती वापराचे सात सिलिंडर जप्त करण्यात आले. तर पथकाने  घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरचा अवैधरित्या वापर होत असल्याच्या माहितीवरुश पथकाने शहानुर मियाँ दर्गा चौकाजवळील एका दुकानावर छापा टाकत ७६ गॅस सिलिंडर हस्तगत केले. या प्रकरणी शेख मुख्तार शेख उस्मान विरोधात कारवाई सुरु असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविण फुलारी यांनी दिली.
आखाती देशातील युद्ध परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविण फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली ११ पथकांकडून हॉटेल, मेससह अन्य व्यावसायिक ठिकाणी तपासणी केली जात आहे. दरम्यान, शहानुर मियाँ दर्गा चौकाजवळील एका दुकानावर घरगूती गॅस व व्यावसायिक गॅसचा अवैधरित्या वापर होत असल्याची माहिती पथकांना मिळाली. त्याआधारे एस.के.गॅस सर्व्हिसेस वेल्डिंग सेंटरवर छापा टाकला, तपासणीत पाच गॅस भरलेले व्यावसायिक सिलिंडर, ४० रिकामे व्यावसायिक व २४ घरगुती रिकामे असे एकूण ६९ सिलिंडर आढळून आले. पंचनामा करत सर्व सिलिंडरसह १ लाख ५१,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दुकानाचा चालक शेख मुख्तार शेख उस्मान याच्या विरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरु असल्याची माहिती पथकाने दिली.ही कारवाई जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविण फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाचे अधिकारी संदीप शिंदे, अन्नधान्य वितरण अधिकारी भारती वाकोडे, झानेश्वर पांचाळ, विनया अंदाडे, स्वाती जाधव, परेमश्वर होळकर व पथकाने केली. बुधवारी जिल्ह्यातील ५१ हॉटेल, खानावळीच्या तपासणी पथकांनी केली. यात हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होत असल्याचे काही प्रकार समोर आले असून यात एकूण सात सिलिंडर जप्त केले.